बीड

आधार नोंदणी व अपडेटसाठी ऑनलाईन पध्दतीने अपॉईन्टमेंट घ्यावी

बीड,दि, 06 :- (जि.मा.का.) आधार नोंदणीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांनी आधार अपॉईटमेंट पोर्टलची स्थापणा केली असून https://ask.uidai.gov.in किंवा https://appointments.uidai.gov.in या लिंकवर जाऊन नागरिक आपल्या भागातील आधार केंद्र शोधून ऑनलाईन अपाँईटमेंट बुक करुन आधार केंद्रावर वेळेवर पोहचून गर्दी टाळू शकतो जेणेकरुन कोविड-19 चा प्रसार थांबवणे शक्य होईल. याबरोबरच आधार केंद्रावर नागरिकांनी गर्दी न करता ऑनलाईन बुकिंगचा जास्तीत जास्त वापर करावा. 
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या कार्यालयीन परिपत्रकानूसार आधार दर पुढील प्रमाणे आहेत. 
नवीन यशस्वी आधार नोंदणी - निशुल्क (मोफत), 5 ते 15 वयोगटातील अनिवार्य असलेले बायोमेट्रिक - निशुल्क (मोफत), आधार दुरुस्ती पूर्ण बायोमेट्रिक सह डेमोग्राफिक अपडेट (डोळे IRIS, हाताचे बोटे,Finger, फोटो ई.)- रु.100/- (जीएसटी सह), आधार दुरुस्ती केवळ डेमोग्राफिक (नाव,जन्म, दिनांक, जेन्डर, पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक दुरुस्ती )- रु. 50/- (जीएसटी सह), ई-आधार डाउनलोड आणि कलर प्रिंट ए-4 पेज- रु. 30/- (जीएसटी सह).
सदर आधार नोंदणी ही आधार चालकाद्वारे ठराविक शासकीय कार्यालयात उपलब्ध असून नागरिकांनी निश्चित केलेले शुल्क आधार केंद्रावर अदा करुन या सेवेचा लाभ घ्यावा. तसेच सदरील केंद्रावर जास्तीच्या शुल्काची मागणी केल्यास नागरिकांनी केंद्रचालकाची तक्रार टोलफ्री क्रमांक- 1947 यावर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनी केले आहे.