युवा सेनेचे राहुल फरताळे यांचा अपघातात मृत्यू


बीड
गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरामध्ये विशाखापट्टनम कल्याण महामार्गावर रिक्षा आणि बुलेट च्या अपघातात बीड येथील युवा सेनेचे विधानसभा अधिकारी राहुल फरताळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अपघात झाला तेव्हा राहुल याचा जागीच मृत्यू झाला या अपघातात पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे

बीड येथील युवा सेनेचे विधानसभा अधिकारी राहुल फरताळे हे शिरदेवी परिसरातून येत असताना एका रिक्षा चालकाची धडक लागून अपघात झाला यावेळी राहुल फरताळे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत मंगळवारी पाचच्या सुमारास राहुल फडताळे एम एच 23-4042 या बुलेटवर प्रवास करत असताना रिक्षाची धडक बसली या रिक्षातील पाच जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले राहुल फडताळे यांच्या निधनामुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे


error: Content is protected !!