शांतिवन कडून मुस्लिम बांधवाना रमजान साठी किराणा किटचे वाटप

बीड(प्रतिनिधी)कोरोनाच्या संकटकाळात आलेला रमजानईदचा सण सामान्य मुस्लिम बांधवांना साजरा करता यावा म्हणून सर्व साहित्य असलेली किराणा सामाणाच्या किट शांतिवन संस्थेच्या वतीने आर्वी येथील मुस्लिम बांधवांना वाटप करण्यात आल्या.  कुठलीही वस्तू त्यांना  विकत आणावी लागणार नाही याची काळजी घेऊन ही मोठी किट तयार करण्यात आली आहे. 
कोरोना मुळे पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही.  अनेकांच्या हाताला काम नाही.अशातच आलेल्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना आणि रमजान ईद साजरी करण्यासाठी गरीब मुस्लिम बांधवांसाठी अडचण येऊ नये त्यांना हा पवित्र सण साजरा करता यावा म्हणून शिरूर तालुक्यातील गरीब गरजू मुस्लिम कुटुंबाना  रमजान ईद साठी लागणारे किराणा साहित्य भेट देण्याचा निर्णय शांतिवन ने घेतला.आर्वी येथील गरजू गरीब कुटुंबाना आज या किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शांतिवन चे संस्थापक दीपक नागरगोजे सरपंच शहाजी भोसले , माजी उपसभापती उद्धव सुस्कर, सुरेश राजहंस,संजय भिंगले, उपसरपंच नंदू भोकरे , अशोक भोकरे लक्ष्मण मस्के, फरताडे साहेब , मधुकरराव भोसले आदी या मोहिमेत सहभागी झाले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!