बीड मध्ये एका महिलेसह दोन मुलांची हत्या


बीड
शहरातील पेठ बीड भागात असलेल्या एका महिलेसह दोन मुलांची हत्या झाल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे महिलेच्या डोक्यात दगड तर एकाचा शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे सांगण्यात आले तर एका मुलाला पाण्यात बुडून मारले गेले आहे ही तिहेरी हत्याकांड ची घटना रविवारी दुपारी घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला वय 30 वर्षे आहे मुलांचे नाव वय 11 व दुसरा मुलगा हा सात वर्षाचा आहे घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या महिलेचा पती पेठ बीड पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो स्वतः बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून आल्याचे सांगण्यात आले सदरील प्रकार नेमका कोणत्या कारणावरून घडला याबाबत आता पोलिस तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!