चकलांब्यात पन्नास मुस्लिम कुटूंबाला शिरखुरमा किटचे वाटप

चकलांबा-रमजान ईद निमीत्त चकलांबा गावचे भुमिपुत्र शिवप्रसाद भगवानराव ( तात्या ) खेडकर ( कार्यकारि अभियंता, जलसंपदा विभाग ) यांच्या सहकार्याने चकलांबा गावातील हातावर पोट आसलेल्या पन्नास मुस्लिम कुटूंबाला शिरखुरमा किटचे वाटप करण्यात आले

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लाॅकडाऊनमध्ये आहे. सर्वच देशवासीय परिस्थितीचे गांभीर्य राखत घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. यातच रमजान ईद सन आल्याने मुस्लीम बांधवांनी देखील देशहित लक्षात घेऊन खरेदी करण्यासाठी बाहेर न पडता घरातच राहणे पसंत केले. चकलांबा पोलिस स्टेशनचे API देशमुख साहेब व पंचायत समिती सदस्य मा.तय्यबभाई शेख यांच्या हास्ते शिरखुरमा किटचे वाटप करण्यात आले या वेळी जावेद शेख , संतोष वैद्य , अकाश खेडकर , राहुल रोकडे व अशोक गुंजाळ उपस्थीत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!