गर्दी झाल्यास पुन्हा लॉकडाउन-मुख्यमंत्री

मुंबई-लॉकडाउन राहणार की उठणार हा हो किंवा नाही चा प्रश्न नाही. हळूहळून एक एक गोष्टी बंद करत गेलो. कोरोनाचा व्हायरस गुणाकार करत आहे. येत्या काळात अनेक केसेस वाढणार आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काळजी करू नये. त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत. लॉकडाउन अचानक उठवणे चांगली बाब नाही. आपण हळूहळू आपल्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणत आहोत. एक एक गोष्टी हळू हळू सुरू करणार आहोत. असे असले तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्क वापरा, हात स्वच्छ धुवत राहा. सॅनेटायझरचा वापर करणे. सरकारने शिथिलता दिल्यास काळजी घ्यावी लागणार. गर्दी झाल्यास पुन्हा लॉकडाउन वाढवण्यात येईल.

कोरोनाकडे थोडंस पॉझिटिव्ह पाहा. कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. जगयाचं कसं, स्वच्छता कशी राखायची, एकमेकांपासून अंतर कसे पाळायचे अशा गोष्टी आपल्याला कोरोनाने शिकवले आहे.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!