महाराष्ट्रमुंबई

उद्धव ठाकरे LIVE : धोका वाढणार, पण घाबरू नका; मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

मुंबई– राज्यात कोरोनाचा धोका वाढणार आहे. पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कोरोनाशी आपण चांगले लढत आहोत. पण यापुढची स्थिती अधिक बिकट असणार आहे. त्यामुळे या कोरोनाचा गुणाकार वाढत जाईल. धोका वाढेल, पण काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहे. आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत.

ते पुढे म्हणाले की, रुग्णांची संख्या गुणाकाराने वाढत आहे. मात्र, हे संकट एवढं मोठं आहे की त्यावर तयारी करण्यासाठी वेळ लागला. 1 हजारहून आता 7 हजार बेड रुग्णालयात उपलब्ध होतील. जनतेनं शिस्थ पाळली म्हणून कोरोनावर मात करणं शक्य झालं. हा आजार गुणाकाराने वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शहरांमध्ये जनजागृती करणारे होर्डिेंग्स लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्रामध्ये दीड लाख आकडा असले असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक्षात 33 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 13 हजाराच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हे सगळं नागरिकांमुळे शक्य झालं आहे, तर साडे तीन लाखाच्या आसपास चाचण्या झाल्या आहेत. 1577 मृत्यू झाले आहेत. कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांची बालक निगेटिव्ह जन्माला आली. छोट्या बालकांपासून मोठ्यांपर्यंत लोक बरे होत आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– मे अखेरीला राज्यात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण दिसतील, असं केंद्राच्या टीमने सांगितलं होतं. तेवढ्या नाहीत तरी आपल्याकडे कोरोनारुग्ण वाढत आहेत. आता अॅक्टिव्ह केसेस 33000 आहेत.

– पुढच्या काही काळात कोरोनाची प्रकरणं वाढणार आहेत. विषाणूच्या संसर्गाचा गुणाकार वाढतो आहे. पावसाळ्यात आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

‘मे महिन्याच्या अखेरीस लाखो रुग्णाचा अंदाज होता; आपण कोरोनाला थोपवलं’

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे.

-ईद घरातूनच साजरी करा. मुस्लिम बांधवाकडूनही सहकार्य मिळतंय.

-कोरोना विषाणू गुणाकार करत जातो. अर्थसंकल्प जाहीर झाला, प्रत्येक भागासाठी काही करणार तोच हे संकट आलं.

-मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात राज्यात सव्वा ते दीड लाख पॉझिटिव्ह केसेस असतील असा केंद्रीय पथकाचा अंदाज होता. खबरदारी म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आता 33,786 पॉझिटिव्ह केसेस आहेत. 13,404 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सव्वा लाख रुग्ण होतील असं भाकीत होतं, पण 33 हजार अक्टिव्ह केसेस आहेत.

-मला हुकूमशहा झाल्यासारखं वाटतंय. घर के बाहेर निकल के देख, दिखाता हूँ असं वाटतं. बाहेर धोका आहे, म्हणून आपल्याला घरी राहायचं आहे.

-बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना पॉझिटिव्ह आईंच्या पोटी जन्माला आलेली बालकं ठणठणीत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर. त्या डॉक्टरांचं, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचं कौतुक आहे.

-पुढची लढाई बिकट आहे. जीवघेणा. घाबरण्याचं कारण नाही. आरोग्य सुविधा निर्माण करतो आहोत. फिल्ड हॉस्पिटल्स उभारण्यात आली आहेत. आयसीयू बेड्स उभे करतो आहेत. रुग्णांची आबाळ होतेय अशा बातम्या येत आहेत. व्हायला नको, पण त्रास होतो. कारण हे संकट अभूतपूर्व आहे. कोणाच्याही आकलनाच्या पलीकडे आहे.

-मे महिन्याच्या अखेरीस 14 हजार बेड्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देऊ शकू. लक्षणं नसलेले, व्हेंटिलेटरची गरज असलेले अशी रुग्णांची विभागणी

-राज्याला रक्ताची आवश्यकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर रक्तदान करावं.

-पावसाळा येतो आहे. साथीच्या रोगांकडे दुर्लक्ष करू नका. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, तोंडाची चव जाणं, थकवा यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं दिसत असतील तर

-पॅकेजच्या घोषणा आधीही झालेल्या आहेत. पॅकेज येतं, आत पोकळ असतं. आधी हे संकट दूर करणं आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *