बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 41 पॉझिटिव्ह

दि.23. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याने बीड जिल्ह्यातील आत्तापर्यंत तपासणी केलेले 41स्वॅब नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातून दि. 23 मे रोजी पाठविलेले 43 स्वॅब नमुन्यांपैकी प्राप्त अहवाल पॉझिटिव्ह 3 असून निगेटिव्ह 39 आले आहेत तर 1व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे

आतापर्यंत जिल्ह्यतून तपासलेले स्वॅब नमुने 847असून निगेटिव्ह थ्रोट स्वॅब नमुने 747, पॉझिटिव्ह नमुने 41 आहेत.

तसेच परदेशातून आलेल्या एकूण व्यक्ती 124 असून त्यांपैकी होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्ती 6, होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या व्यक्ती 118, इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन व्यक्ती 12 आहेत .
इतर जिल्ह्यातून आलेल्या आणि होम क्वारंटाईन केलेले व्यक्ती 11 हजार 139 आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!