उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह

उस्मानाबाद /प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण येथील 33 वर्षीय महिला आणि मुरूम (कोथळी ) येथील 23 वर्षीय तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
आज जिल्हातील एकूण 41 जणांचे अहवाल पाठवण्यात आले होते त्यातील दोघांचे अहवाल पॉजिटीव्ह आणि 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 4 जणांचे अहवाल प्रलंबित आले आहेत आणि चाचणीसाठी पाठवण्यात आलेला एक नमुना रद्द करण्यात आला आहे.
मुरूम आणि शिराढोण मध्ये नव्याने रुग्ण आढळल्याने रेड झोन मध्ये वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!