स्वयंशिस्त पाळून कोरोनाला हरवूया-डॉ.क्षीरसागर


बीड दि.२० (प्रतिनिधी)-गेल्या पंचावन्न दिवसांपासून बीड शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र काही बेजबाबदार लोकांच्या मनमानी कारभारामुळे बीडकरांना कोरोनाचा सामना करण्याची वेळ आली आहे.सुरुवातीपासूनच नगरपालिकेच्या माध्यमातून आपण योग्य ती खबरदारी घेतली होती. मात्र आता परिस्थिती बदलू लागली आहे,अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाला हरवण्याची जिद्द ठेवली पाहिजे असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
बीड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळून येईल त्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करून घ्यावी.त्याच बरोबर आतापर्यंत ज्यापद्धतीने बीडकरांनी सूचनांचे पालन केले आणि कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेतली असे असतानाही ही काही बेजबाबदार लोकांच्या मनमानी कारभारामुळे परिस्थिती बदलून गेली.बाहेर गावातून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे.आपण बाधित क्षेत्रातून आलेले असाल तर तातडीने आपण आपली तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. असे न केल्यास आपणच आपल्या घरातल्या आणि शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळत आहोत हे लक्षात ठेवावे त्यामुळे प्रत्येक संशयित असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःहून आपली आरोग्य तपासणी करून घेणे घेऊन सहकार्य करावे प्रत्येक नागरिकांनी आता स्वयं शिस्तीचे पालन करून कोरोनाचा सामना सुरू ठेवावा लागेल.चला आपण आपली आणि आपल्या आजूबाजूची काळजी घेऊन कोरोनाला हरवू यात असे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!