बाहेर गावातून आलेल्या व्यक्तीची नोंद करा-खा ओमराजे निंबाळकर

प्रतिबंधक भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याच्या सूचना

उस्मानाबाद/ प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने गावास भेट दिली.पुणे-मुंबई वरून नागरिक आपल्या स्वगृही परतत आहेत अशा व्यक्तींची प्रशासनाने नोंद घेऊन त्यांची प्रशासनाने अशा नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांना शक्यतो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात यावे.प्रतिबंधक भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्याऱ्या व आत येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, या झोनमधील लोक कामाशिवाय बाहेर जाता कामा नये. प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी प्रशासनाने करावी. या भागातील नागरिकांनी हि प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. तसेच जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनातील सर्व कर्मचारी काम करताना स्वतः काळजी घ्या असे आवाहन केले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे, तहसीलदार विजय अवदाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे, ग्रामविकास अधिकारी अशोक काळे, पोलिस उपनिरीक्षक चौरे, तसेच आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!