बीड

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांनी मैदान जिंकले:बीडमध्ये शिवसेनेची अभूतपूर्व मुसंडी

बीड, दि.१८ (प्रतिनिधी)- बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी निवडणुकीचे मैदान जिंकले. शिवसेनेने बीड विधानसभा मतदारसंघात अभूतपूर्व मुसंडी मारली. ग्रामिण भागात शिवसेनेचे आणि जयदत्त क्षीरसागरांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. २९ ग्रामपंचायतीपैकी २१ ग्रामपंचायतीवर भगवा डौलाने फडकला.


विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे.माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, जिल्हा संघटक नितीन धांडे, महिला आघाडीच्या संगिता चव्हाण, सुनिल सुरवसे, परमेश्वर सातपुते,विलास बडगे, दिनकर कदम, अरूण डाके, दिलीप गोरे, गणपत डोईफोडे, प्रा.जगदीश काळे, नानासाहेब काकडे, सखाराम मस्के, अरूण बोंगाणे, जाफरभाई, कलंदर पठाण सुभाष क्षीरसागर, वैजीनाथ तांदळे, सुधाकर मिसाळ, गोरख सिंगण, सुशिल पिंगळे, रतन गुजर, बप्पासाहेब घुगे, विजय सरवदे,सुलेमान पठाण,संतोष कंठाले, सतीश काटे,गणेश खांडे,अ‍ॅड.राजेंद्र राऊत, सागर बहीर गणेश वरेकर,अर्जुन बहिरवाळ, कल्याण कवचट,यांच्या नेतृत्वाखाली बीड मतदारसंघातील २९ ग्रामपंचायतीपैकी २१ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे.

निडणुकीपूर्वीच बीड मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बीड मतदारसंघात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले आहे. तसेच शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ४ ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये रायमोहा, टाकळवाडी, व्हरकटवाडी, भानकवाडी यांचा समावेश आहे. तसेच बीड मतदारसंघात मौज, ब्रम्हगाव, मौजवाडी, मैंदा पोखरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, कारळवाडी, निर्मळवाडी, कर्जणी, कोळवाडी, गुंधा, जिरेवाडी, पिंपळगाव घाट, वासनवाडी, वंजारवाडी, गुंदावाडी, वायभटवाडी, बाळसापूर, बेलखंडी पाटोदा, वरवटी, आहेरधानोरा, मानेवाडी, भंडारवाडी या २१ ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे.

बीड आणि शिरूर तालुक्यातील ३५ पैकी २५ ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना कौल दिला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी संपर्वâ कार्यालयात शुभेच्छा देवून सत्कार केला.