कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 381 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 31 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 350 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

अंबाजोगाई 11 बीड 10 केज 1 माजलगाव 5 परळी 3 वडवणी 1

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात एकूण 3 हजार 81 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 90 हजार 759 वर पोहचली आहे. यापैकी 18 लाख 86 हजार 469 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात कोरोनामुळे 50 हजार 738 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 52 हजार 562 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासांत 15,144 नव्या रूग्णांची नोंद झाली. देशातील सक्रीय रुग्णसंख्या 2,08,826 इतकी कमी आहे. गेल्या 10 दिवसांपासून दर दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 20,000 पेक्षा कमी झाली आहे.

गेल्या 24 तासांत 17,170 नवे रूग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा वाटा 96 टक्‍के इतका आहे. 80 टक्‍के रूग्ण 10 राज्यांमधील आहेत. केरळमध्ये बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या सर्वाधिक असून 5,011 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,039 रूग्ण बरे झाले असून त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ही संख्या 930 इतकी आहे.


error: Content is protected !!