बीड जिल्ह्यात 115 डिस्चार्ज 128 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1482 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 128 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1354 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 7, आष्टी 8

बीड 24, धारूर 6, गेवराई 8,

केज 4, माजलगाव 10,

परळी 3 , पाटोदा 1

शिरूर 56, वडवणी 1

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12515 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 10784 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1327 जणांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी 115 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 404 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


error: Content is protected !!