एक महिन्यातच 8500 आरोग्य कर्मचाऱ्यांची मेगा भरती:जाहिरात प्रसिद्ध होणार

कोरोना दरम्यान आरोग्य विभागाने उत्तमरित्या आपली कामगिरी बजावली. परंतु अपुर्‍या मनुष्यबळाची उणीव देखील जाणवली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश डिसेंबर महिन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात लवकरच मेगाभरती करण्यात येणार आहे.

दरम्यान, येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होणार असून उद्या सोमवारी या मेगाभरतीची जाहीरात निघणार असून या विभागात ८ हजार ५०० पदं भरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनादरम्यान आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात १७ हजार पदांची भरती होणार आहे.
यापैकी ८ हजार ५०० पदांची भरती निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ते असेही म्हणाले, कोरोनाचं संकंट सुरू असताना या दरम्यान कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याचे नोकरीचे कंत्राट संपले होते. तरी देखील त्यांनी येत्या काळात इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याच्या विचारात सरकार आहे. तर कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपले त्यांना नोकरीवरून काढून टाकले त्यामुळे त्यांना बेरोजगाराच्या समस्येला सामोरे जावे लागले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याने सध्या तरी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभागात नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून आतापासून तयारीला लागल्यास नोकरी मिळवणे शक्य होणार आहे.


error: Content is protected !!