आज आणखी सात पॉजिटीव्ह; जिल्ह्यात धोक्याची घंटा वाजली
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नऊ
बीड
बीड जिल्ह्यात काम दोन कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 29
जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 22 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत आता बीड जिल्ह्यात त्यांची संख्या नऊ झाली आहे ही संख्या आता बीड करांसाठी धोक्याची आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी आता गर्दी टाळून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे
कोरोना कोव्हीड 19 – बीड जिल्हा अपडेट
दिनांक – 17/05/2020
विदेशातून आलेले – 124
होम क्वारंटाईन- 0 0
होम क्वांरटाईनमधून मुक्त- 118
परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले- 192
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन – 40
एकूण पाठविलेले स्वॅब – 433
*एकूण निगेटिव्ह स्वॅब- 424
*एकूण पॉझिटिव्ह स्वॅब – 09
आज पाठविलेले स्वॅब – 29
ऊसतोड मजूरांचे प्रवेश – 46775
1)इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून त्याची लोकसंख्या 4740 असूनत्यामध्ये आज एकूण 1275 घरांचा सर्वे करण्यात आला
2)हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून त्यांची लोकसंख्या 3397 असून त्यामध्ये आज एकूण 695 घरांचा सर्वे करण्यात आला
रविवारी 7 पॉजिटिव्ह आले.
यात 66, 65, 43, 38, 36, 10, 6, अशी त्यांचे वय असून पाच पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे.
हे सर्व १३ मे रोजी मुंबईहून निघाले होते. १४ तारखेला आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले होते.
हे सर्व पिंपळगाव खुडा ता.अहमदनगर येथील रहिवाशी आहेत.आता जिल्ह्यात एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 9 झाली आहे