तिसऱ्या लॉकडाऊनचेच नियम 31 मे पर्यंत लागू राहणार -जिल्हाधिकारी


बीड/प्रतिनिधी
देशात आणि राज्यात चौथ्या लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आल्यानंतर या काळात असलेल्या नियमांची घोषणा करण्यात आली तिसऱ्या लॉक डाउन मध्ये जे नियम लागू करण्यात आले होते हेच नियम आता 31 मे पर्यंत लागू राहतील असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत

आज 17 मे रोजी तिसरा लॉक डाऊन संपला आहे उद्या दिनांक 18 मे पासून ते 31 मे पर्यंत चौथ्या लोक डाऊन ची ही घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे राज्य सरकारने याच नियमांना धरून आपली नियमावली जाहीर केली आहे आज आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश काढून तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये जी नियमावली लागू करण्यात आली होती तीच नियमावली आता चौथ्या लॉक डाऊन मध्ये 31 मेपर्यंत लागू राहणार असल्याचे म्हटले आहे यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ दारूविक्री यासारख्या विक्रीवर बंदी असल्याचे त्यात म्हटले आहे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही रेखावार यांनी म्हटले आहे
यापूर्वी सम आणि विषम दिवशी जे नियम लागू केले होते तेच नियम कायम ठेवण्यात आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!