त्या सात पैकी एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू

बीड/प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील पाटसांगवी येथील सात जण कोरोना पॉजिटीव्ह रूण आढळून आले होते त्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली होती
आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण )येथे कोरोनाबाधित आढळलेल्या ६५ वर्षिय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. कालच तिच्यासह सात जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते.मुळची पिंपळगाव ( ता.जि.नगर) येथील ती रहिवासी असून मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकाकडे आली होती.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली

दिनांक 17 रोजी या सात जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले यामधील 65 वर्षीय एका महिलेचा आज सोमवारी पहाटे मृत्यू झाला असून हा मृत्यू ही महिला कोरोना बाधीत होती उर्वरित सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!