नोकरी गेली तरी नो टेन्शन! मोदी सरकारच्या या योजनेतून मिळणार 2 वर्षांपर्यंत पगार

नवी दिल्ली, 09 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या संकटामुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अर्थव्यवस्थेवर या महामारीचा परिणाम येणाऱ्या काळात अधिक जाणवू लागेल. या काळात होणाऱ्या नुकसानामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यास सुरूवात केली आहे. या संकटाच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रात लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. जर तुम्हालाही अशीच भीती वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दरम्यान केंद्र सरकारची अशी एक योजना आहे, ज्यामुळे बरोजगार झाल्यास 24 महिन्यांसाठी तुम्हाला पैसे मिळतील. जाणून घेऊयात याच योजनेबद्दल.

दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत

मोदी सरकारच्या या योजनेचे नाव ‘अटल बीमित व्यक्ती कल्याण’ योजना असे आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणारा फायदा असा आहे की, नोकरी गेल्यास सरकार तुम्हाला आर्थिक मदत करेल.

ही आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला मिळेल. मागील 90 दिवसांच्या सरासरी उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम बेरोजगार व्यक्तीला मिळेल. या योजनेचा लाभ संघटित क्षेत्रातील तेच व्यक्ती उचलू शकतात ज्यांना ESIC विमा मिळतो आहे आणि दोन वर्षांपेक्षा कमी काळ ज्यांनी नोकरी केली आहे. त्याशिवार डेटा बेसशी आधार आणि बँक डिटेल्स संलग्न असणं गरजेचं आहे.
योजनेसाठी अशी करा नोंदणी
जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्हाला ESIC च्या वेबसाइटवर जाऊन अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या लिंकवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते

या व्यक्तींना लाभ मिळणार नाही

चुकीच्या वर्तणुकीमुळे कंपनीतून काढून टाकले असल्यास त्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याशिवाय फौजदारी खटला दाखल झाला असल्यास किंवा कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृती (VRS) घेतली असल्यास अशा व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!