अनेकांचा जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर मारला गेला
अहमदनगर बीड सोलापूर आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यात 11 बळी घेणाऱ्या बिबट्याला आज वन विभाग आणि शार्प शूटरच्या मदतीने गोळ्या घालण्यात आल्या. आणि या नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर यश आले आहे करमाळा तालुक्यातील वांगी नं.4 येथे रांखुडे वस्ती वर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या शेतात त्याला ठार मारण्यात आले.
औरंगाबाद ,अहमदनगर,बीड आणि सोलापूर जिल्ह्यात या नरभक्षक बिबट्याने 11 लोकांचा बळी घेतला होता.काल सायंकाळ पासून बिबट्याला मारण्याची प्रक्रिया सुरू होती.
काल सायंकाळी हा बिबटया बिटरगाव मध्ये आढळून आला.वन विभागाच्या सूत्रानुसार हा बिबटया उजनी च्या काठावरून परत आल्या मार्गाने निघाला होता.गेल्या तीन दिवसांपासून त्याने कोणावरही हल्ला केला नव्हता.त्याला उजनीच्या पाण्यामुळे पुढे जाण्यास अडचण निर्माण होत होती त्यामुळे तो परत मागे आल्या रस्त्याने फिरला होता.
काल सायंकाळी या भागात शेतकऱ्यांना बिबटया दिसल्यानंतर रात्रीपासून त्याला मारण्यासाठी प्रयत्न सुरू होते .सोलापूर वन विभाग आणि पुणे येथील रायफल क्लब चे चंद्रकांत मंडलिक यांच्या शार्प शूटर च्या मदतीने त्याला ठार मारण्यात आले.
आष्टी तालुक्यात धुमाकूळ सुरू असतानाच सरपंच संघाचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी बिबट्याला मारण्याची मागणी केली होती