दुःखद बातमी:केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन. गुरुवारी दिल्लीमध्ये त्यांनी घेतला अखेरचा श्वास. 74 वर्षीय पासवान मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता. मुलगा चिराग पासवान यांनी ट्वीटरवरुन दिली माहिती.

काही दिवसांपूर्वी झाली होती हार्ट सर्जरी

रामविलास पासवान मागील एक महिन्यापासून हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होते. एम्समध्ये 2 ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्यावर हार्ट सर्जरी झाली होती. ही पासवान यांची दुसरी हार्ट सर्जरी होती. यापूर्वी त्यांची एक बायपास सर्जरी झाली होती.


error: Content is protected !!