बीडमध्ये हार्डवेअरच्या गोदामात केमिकलचा स्फोट:एक ठार दोन जखमी

बीड -शहरातील चंपावती हार्डवेअर च्या गोदामात केमिकल चा स्फोट झाल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली .हा स्फोट केमिकलचा असला तरी नेमकं कोणतं केमिकल यात होत याची माहिती मिळू शकली नाही,घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे .

शहरातील जिजामाता चौक भागात असलेल्या चंपावती हार्डवेअर या दुकानाचे गोडावून काही अंतरावर आहे .दुकानातील केमकील च्या रिकाम्या कॅन गोडावून मध्ये नेण्यात येत होत्या .त्यावेळी या कॅन घेऊन तीन कामगार गेले होते .

या कॅन मधील शिल्लक असलेले केमिकल नालीत ओतत असताना मोठा स्फोट झाला .यामध्ये अनिरुद्ध पांचाळ या कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले .हा स्फोट इतका भीषण होता की तिथे असलेल्या ऍक्टिवा गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच शेजारी असलेल्या डॉ शेंडगे यांच्या रुग्णालयाच्या इमारतीच्या काचा अक्षरशः फुटल्या .

या घटनेची माहिती मिळताच बीड चे उपअधीक्षक अर्जुन भोसले,पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी घटनास्थळी भेट दिली असून बॉम्ब शोध पथक देखील दाखल झाले आहे


error: Content is protected !!