ऑनलाइन वृत्तसेवानवी दिल्ली

एप्रिलपासून सॅलरी स्ट्रक्चरची पद्धती बदलणार:कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल

एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ आणि ग्रॅच्यूटीच्या नियमात बदल होणार आहेत. सरकार या नवीन Compensation नियम लागू करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये बदलाव पाहायला मिळेल.

या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांची सॅलरी स्लीप, प्रोव्हिंडंट फंड, ग्रॅच्यूटी, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार यामध्ये देखील बदल होईल.

हे नियम गेल्यावर्षी संसदेत पारित झालेल्या वेज कोडचा भाग आहेत. पुढील फायनान्शिअल वर्षामध्ये पगाराची नवीन परिभाषा सुरू होणार आहे. या नवीन नियमात अलाउन्सची मर्यादा निश्चित आहे. हा एकूण सॅलरीच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त नसेल

ET च्या बातमीनुसार नवीन नियमांनुसार कंपन्यांच्या अधिकतर पे स्ट्रक्चकमध्ये बदल पाहायला मिळेल. कंपनी आणि कर्मचारी दोघांच्या पीएफ कॉन्ट्रिब्यूशनमध्ये वाढ होईल. हे योगदान वाढल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे.

दरम्यान निवृत्तीनंतर ग्रॅच्यूइटीची रक्कम वाढेल. Gratuity ची मोजणी बेसिक सॅलरीच्या आधारावर होते. शिवाय पीएफ कॉन्ट्रिब्यूशन वाढल्याने आणि ग्रॅच्यूइटीच्या जास्त पेमेंटमुळे कंपन्यांची कॉस्ट वाढू शकते.

इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, नवीन परिभाषेमुळे सॅलरी स्ट्रक्चरची पद्धती बदलेल. आता अनेक प्रकरणात अलाउन्स जास्त तर सोशल सिक्योरिटी कॉन्ट्रिब्यूशन कमी दिले जाते.