गृहकर्जाचे टेन्शन नको:लवकर कर्ज फेडण्याचे सोपे उपाय,व्याज कार्यकाळ कमी करता येतो

मुंबई, 08 डिसेंबर : सध्याच्या काळात स्वतःचं घर घेणं खूप अवघड आहे. स्वतःचं घर घेणं आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे. घरासाठी कर्ज घेणं हा खूप मोठा निर्णय आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. घरासाठी कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी आहे. अगदी सहज कोणतीही बँक आपल्या ग्राहकांना कर्ज (home loan) उपलब्ध करून देते.

पण त्यानंतर कमीतकमी 20 वर्ष त्यासाठी हफ्ते भरणं खूपच मोठी गोष्ट आहे. काही वेळा आयुष्यात आर्थिक संकटं येतात तर काही वेळा जागतिक संकटामुळे व्यक्तीवरील आर्थिक भार वाढतो. अशा परिस्थितीत हे कर्ज फेडणं अवघड होऊन बसतं. पण काही वेळा तुम्ही हे कर्ज लवकर फेडून व्याजाची मोठी बचत करू शकता.

त्याचबरोबर भविष्यात मोठी बचत करण्याच्या दिशेने देखील वाटचाल करू शकता.

लवकरात लवकर कर्जातून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरासाठी घेतलेल्या कर्जातून लवकर मुक्त होऊ शकता.

कर्जाचा कार्यकाळ कमी करा

सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत कमी करणं. या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त होऊ शकता. त्याचबरोबर कर्जाच्या हफ्त्यांबरोबर आणखी काही रक्कम खात्यात जमा करत जा. यामुळे तुम्ही जितकी जास्त रक्कम खात्यात जमा कराल तितकंच व्याज तुम्हाला कमी पडेल. तुम्ही जितक्या लवकर बँक खात्यात रक्कम तितक्याच वेगानं तुमच्या कर्जाच्या व्याजामध्ये देखील कपात होईल. त्यामुळे शक्य तितकी जास्त प्रमाणात रक्कम जमा केल्यास तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता.

कमी व्याजासाठी बँकांशी बोला

बर्‍याच वेळा कमी कालावधीसाठी कर्ज परत करणं आकर्षक वाटेल. पण महिन्याला मोठी रक्कम हफ्त्याच्या रूपात परत करणं अवघड होऊन बसेल. जर तुम्ही आधीच गृहकर्ज घेतलं असेल तर तुम्हाला व्याजामध्ये सूट मिळणं शक्य नाही. तसंही कोणतीही बँक आपले व्याजदर कमी करण्यास तयार नसते. त्यामुळे कमी रकमेचे कर्ज काढणंच हितावह ठरणार आहे.

अशावेळी विविध बँकांतील व्याजदराची (EMI) तुलना करून ज्या बँकेत कमी व्याजदर आहे तिथं तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे तुमचं कर्ज दुसऱ्या बँकेत देखील हस्तांतरित होऊ शकतं. मुख्य म्हणजे या दोन्ही प्रक्रियांमध्ये तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. ज्या बँकेतून तुम्ही कर्ज हलवणार आहेत त्यांची दंडाची रक्कम आणि ज्या बँकेत कर्ज हस्तांतरित करायचे आहे तेथील प्रक्रिया शुल्क देखील तुम्हाला भरावे लागेल. त्यामुळे सर्व गणिते तयार करून तुमची बचत कुठे होते हे पाहून पुढील प्रक्रिया करू शकता.

उत्पन्नाचा स्रोत वाढवून हफ्त्याची रक्कम वाढवणं

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कर्जाच्या रकमेत फरतफेडीची मुदत मोठी आहे. यामध्ये या कालावधीत तुमचा कमाईचा आकडा देखील वाढणार आहे. त्यामुळे कर्जाच्या रकमेत वाढ होऊ न देण्यासाठी कर्जाच्या हफ्त्याच्या थोडी जास्त रक्क्म फेडत राहिल्यास तुम्हाला फायदा आणि बचत दोन्ही होणार आहे. यामुळे तुमच्या कर्जाच्या कालावधीत देखील कपात होऊन तुम्ही भविष्यकाळात दीर्घ बचत करू शकता. हप्त्यापेक्षा थोडी अधिक रक्कम भरण्यासाठी कदाचित तुम्हाला कमाईचा एखादा जादाचा मार्ग शोधावा लागू शकतो.


error: Content is protected !!