12 आमदारांच्या निवडीला विलंब:राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अधिवक्ते राज पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.


error: Content is protected !!