बीड जिल्ह्यात आज 52 कोरोना पॉझिटिव्ह तर 48 कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 773 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 52 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 721 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 2 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 8,बीड 12,धारूर 3,गेवराई 2,केज 4, माजलगाव 3 परळी 9 पाटोदा 1 वडवणी 11 रूग्ण सापडले आहेत.वडवणी तालुक्यात एकाच गावात पिंपळ टक्का येथे 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत

जिल्ह्यातील कोरोना बाधीत आकडा 15697 असून 14684 जण कोरोनामुक्त झाले आहेत काल 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या 508 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यत 497 जणांचा मृत्यू झाला आहे


error: Content is protected !!