कोरोनापासून बचाव करण्यासाठी होमिओपॅथिक महाविद्यालयात होमिओपॅथी औषधाचे वाटप सुरू

होमिओपॅथीच्या अर्सेनिक औषधाचा प्रतिबंधात्मक म्हणून उपयोग करणे फायद्याचे ठरणार


बीड (प्रतिनिधी)
कोरोना व्हायरस सारख्या संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये प्रतिबंधात्मक उपचार करता येतात तसेच यापासून झालेल्या आजारावर सुद्धा होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत त्यामुळे जनतेने या आजारापासून घाबरण्याचे कारण नाही. अशी माहिती डॉ. अरुण भस्मे यांनी दिली.


250 वर्षांपूर्वी होमिओपॅथीचे आद्यप्रवर्तक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी जंतूंमुळे रोग होत नसून जंतू हा आजाराचा परिणाम आहे असे सांगितले आहे. त्यामुळे आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे त्यासाठी आपण भारतीय संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपला आहार, विहारावर नियंत्रण ठेवणे, व्यायाम करणे, योगासने करणे त्याचबरोबर होमिओपॅथीचे अर्सेनिक ह्या औषधाचा प्रतिबंधात्मक म्हणून उपयोग करणे आवश्यक आहे. हे औषध सोमल या विषापासून तयार केलेले आहे. त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर हे औषध न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे गरजेचे आहे. मर्दनीकरणाच्या क्रियेमुळे होमिओपॅथिक औषधामध्ये मूळद्रव्य आढळत नाही त्याचे भौतिक गुणधर्म नाहीसे होतात व औषधी गुणधर्म प्रगट होतात. म्हणून होमिओपॅथी औषधीने साईड इफेक्ट होत नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांनी मार्च मध्येच सरकारी यंत्रणेमार्फत जनतेला अर्सेनिक हे साथीच्या रोगावर प्रतिबंधात्मक वापरण्यात आले त्या ठिकाणी या आजाराचा प्रादुर्भाव झाला नाही असे अनेक राज्यात घडले आहे. आपल्या राज्यातही सरकारने यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
बीडच्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या महात्मा गांधी रुग्णालयात कोरोना व्हायरस इन्फेक्शन होऊ नये म्हणून मोफत होमिओपॅथिक औषधी वाटप सुरू आहे याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव जयदत्त क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर,डॉ. अरुण भस्मे, डॉ प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल, उपप्राचार्य डॉ. गणेश पांगारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!