१७ मेनंतरच्या लॉकडाउनमध्ये कोणत्या प्रकारची सूट मिळू शकते !

मुंबई/वृत्तसेवा

अटींसह सार्वजनिक वाहतुकीस परवानगी देणेऑटो रिक्षा आणि कॅब अ‍ॅग्रिगेटर्सना अटीसह परवानगी दिली जाऊ शकते. त्यांना जास्तीत जास्त २ प्रवाश्यांना बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

विमान वाहतुकीला परवानगी मिळू शकते. मात्र, ज्या राज्यातून विमान उड्डाण करणार आहे आणि ज्या राज्यात ते जाणार आहे, अशा दोन्ही राज्याची विमान वाहतुकीसाठी सहमती आवश्यक आहे.

रेड झोन्समधील मेट्रो सेवा पुढेही बंद ठेवल्या जाऊ शकतात.

रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल्सलाही काही अटींसह उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

कंटेनमेंट झोनमध्ये अधिक कडक नियम लागू होऊ शकतात. कोणत्या क्षेत्रात कोणत्या उपक्रमांना परवानगी आहे याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना मिळू शकतो.

आतापर्यंत केंद्र सरकारकडून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचा निर्णय घेतला जात आहे. केवळ केंद्रच झोनमध्ये बदल करू शकते. मात्र, झोन ठरविण्याचा अधिकार राज्यांना मिळाला पाहिजे आणि कोणत्या झोनमध्ये कोणत्या उपक्रमांना परवानगी दिली पाहिजे, हे ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळावेत, अशी राज्यांची केंद्र सरकारकडे मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!