बीड जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित आढळले;आता तरी काळजी घ्या

बीडकरानो घाबरून जाऊ नका;सतर्क राहा


बीड
गेल्या 55 दिवसापासून बीड जिल्हा प्रशासनाने आणि नागरिकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कडकडीत लॉक डाऊन चे पालन केले दोनच दिवसात थोडी मोकळीक मिळाली आणि जिल्ह्या बाहेरून आलेले इटकूर ( ता गेवराई) तर दुसरा हिवरा (ता. माजलगाव ) येथील दोन जण पॉजिटीव्ह आढळले असून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
गेल्या पंचावन्न दिवसापासून बीड जिल्ह्याने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी अत्यंत कडक पणे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन च्या नियमांमध्ये थोडी शिथिलता जाहीर केली आणि दोनच दिवसात जिल्ह्याबाहेर असलेल्या बाधीत क्षेत्रातून अनेक जण दाखल होऊ लागले याचेच उदाहरण म्हणून आज आज बीड जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत आतातरी बीडकरांनी सावध व्हावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!