ऑनलाइन वृत्तसेवा

आनंदाची बातमी:बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना वार्षीक पातळीवर 15 टक्के पगारवाढ

मुंबई – बॅंक कर्मचारी संघटना आणि बॅंक व्यवस्थापनादरम्यान झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना वार्षीक पातळीवर 15 टक्के पगारवाढ मिळणार आहे.

ही पगार वाढ 1 नोव्हेंबर 2017 पासून लागू होणार असून यामुळे बॅंकांना 7898 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च लागणार आहे. प्रथमच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये चांगल्या कामाबद्दल उत्तेजन देण्याची योजना सुरू करण्यात आली असून खाजगी आणि परकीय बॅंकांना हा पर्याय स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे.

त्यानुसार ज्या बॅंकांचा नफा वाढेल त्या कर्मचाऱ्यांना आर्थिक उत्तेजन मिळणार आहे. कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापनादरम्यान 11 वेळा चर्चा झाल्यानंतर हा निर्णय झाला आहे.