शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर थेट बांधावर

बीड – परतीच्या पावसाने खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी अन त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे माजीमंत्रि जयदत्त क्षीरसागर आज बीड विधानसभा मतदार संघातील काही गावाच्या भेटीला गेले होते, थेट बांधावर जाऊन त्यांनी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानी ची पाहणी करून शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेत, शेतकऱ्यांना धीर दिला

यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडवून देत बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम उध्वस्त केला, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला, प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे , आज माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदार संघातील रायमोहा सर्कल मधील रायमोहा, डिसलेवाडी, तागड गाव , आनंदवाडी ,बाभूळ खुंटा,जरूड फाटा,सह काही गावाना भेटी देत थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून घेतल्या, उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना धीर देत, हे महा आघाडी चे सरकार शेतकऱ्यांचे हित पाहणारे सरकार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुमचे अश्रू अन तुमच्या भावनांची कदर आहे, मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी खंबीर आहेत, धीर सोडू नका, नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आहेत, शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम हे सरकार नक्की करेल अशा आशावाद व्यक्त केला, निसर्गाच्या अवकृपेने परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे, खरीप हंगाम उद्धवस्त झाला आहे, कापूस , तूर , सोयाबीन , बाजरी पिके नेस्तनाबूत झाली आहेत, शेतकरी खचू नये त्यासाठी शेतकऱ्यांना भक्कम आधार देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे असा विश्वास शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

या वेळी सोबत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, बाजार समिती सभापती दिनकर कदम, दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, अरुण डाके , ऍड राजेंद्र राऊत,अरुण बोंगाणे,परमेश्वर सातपुते, नानासाहेब काकडे,सखाराम मस्के, सुनील सुरवसे पं स.सभापती उषाताई सरवदे,सुधाकर मिसाळ,वसंत सानप,सतीश काटे ,नारायण परजणे सुनिल गाडेकर,सुभाष क्षीरसागर ,सुलेमान पठाण संजय सानप ,आयुब तांबोळी
प्रकाश इंगळे ,हरी मामा खेडकर ,संजय सानप
कलंदर पठाण ,संतोष कंठाळे गणेश घोलप,तुकाराम धनगुडे,भागवत सानप सरपंच,अंकुश उगले,गहीनाथ नागरगोजे,उगले पोलीस पाटील,बाबासाहेब लेहणे
बडे सरपंच,शेतकरी संजय नामदेव सानप,दिलीप ढिसले,महादु ढिसले,अंकुश डोळे,संतोष,ढिसले,दादासाहेब ढिसले,अभिमान सांगळे बाळु ढिसले,सदाशिव सानप,हनुमंत सांगळे सरपंच
नवनाथ सानप,रमेश तांबारे साहेबराव ढिसले,संजय ढिसले,श्रीधर सानप,हनुमंत तांबारे,तर नाळवंडी सर्कल दौऱ्यात पंजाब काकडे,हनुमंत बोरगे, उद्धव येवले,महादेव येवले,सुनील येवले,कुटे महाराज,सचिन घोडके,आदि उपस्थित होते

——————————————————–
शिरूर व बीड तालुक्यातील शेतात माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना सर्व बाजूने मदत केली पाहिजे सरसकट नुकसान भरपाई दयावी, पंचनामे होत राहतील, शेतकऱ्यांना तातडीची मदत होणे गरजेचे आहे. परतीच्या पावसाने मराठवाड्यात खूप नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी बांधवाला आतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे.कापूस तूर बाजरी ही पिके सडून गेली आहेत तर उसाचे पीक ही वादळी वाऱ्याने झोपले आहे,शेतकरी उद्भवस्थ झाला आहे, यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या तातडीच्या मदतीची गरज आहे शेती व माती साठी आता कटिबद्ध राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी केंद्राने महाराष्ट्राशी दुजाभाव न करता मदत करणे गरजेचे आहे. शेतकरी जगला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे सरकार हे मायबाप आहे सरकार शेतकऱ्यांचे आहे सर्वसामान्यांचे आहे त्यासाठी सरकारने तो विश्वास सार्थ करून दाखविला पाहिजे.असेही माजीमंत्री क्षीरसागर म्हणाले

–—————————————————


error: Content is protected !!