मराठवाड्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता:सावधानतेचा इशारा

पुढील चार ते पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं आहे. मात्र अद्यापही परतीचा पाऊस परतलेला नाही.
यातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी २१ ऑक्टोबरपर्यंत रिपरिप सुरू असणार आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
१८ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
१९ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
२० ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गाफील राहू नका. मुख्यमंत्र्यानी दिला सावधानतेचा इशारा राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका.
नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत रहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा,
असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले.


error: Content is protected !!