पिककर्ज आणि कर्जमाफीची प्रकरणे 20 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड- 30 सप्टेंबर अखेरीस सर्व बँकांकडे प्रलंबित असणाऱ्या पीक कर्जाचे गाव निहाय वर्गीकरण करून प्रत्येक गावाचा पीक कर्जाची अर्ज आणि कर्जमाफीचे अर्ज असे वर्गीकरण करून दोन्ही प्रकरणाची तात्काळ कारवाई करून 20 ऑक्टोबर पर्यंत ते निकाली काढण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की 30 सप्टेंबर अखेरीस सर्व बँकांकडे प्रलंबित असणाऱ्या पीक कर्जाचे सर्वप्रथम गाव निहाय वर्गीकरण करावे त्यानंतर प्रत्येक गावच्या गट यांचे दोन प्रकारात वर्गीकरण करावे जे लाभार्थी कर्जमाफीच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र आहेत परंतु अद्याप त्यांच्या खात्यावर सर्व रक्कम शासनातर्फे जमा झाली नाही असे व दुसरे वर्गीकरण आलेले सर्व अर्जदार यांची यादी तयार करणे वरील दोन्ही प्रकारच्या अर्जाची गाव निहाय संख्या तात्काळ जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांना पाठविण्यात यावी या अर्जावर तात्काळ कारवाई करून 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत ही प्रकरणे निकाली काढण्यात यावीत पहिल्या प्रकारच्या अर्जाची तपासणी कर्जमाफीची रक्कम शासनातर्फे जेव्हा जमा होईल तेव्हा करण्यात यावी तोपर्यंत त्यांना नामंजूर करण्यात येऊ नये कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम शिल्लक आहे त्यांच्याकडून ते तात्काळ पूर्ण करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत दिले आहेत


error: Content is protected !!