मोदी सरकारकडून तुमच्या खात्यात 2 हजाराचा शेवटचा हफ्ता:असा चेक करा बॅलन्स

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या अंतर्गत केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्याच्या खात्यात २ हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ( PKSY) पुढच्या महिन्यात शेतकर्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ३ हफ्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १० कोटी शेतकऱ्यांना जोडण्यात आलंय. १ ऑगस्टपासून सरकार शेवटचा हफ्ता देणार आहे. नव्या वर्षात तुम्ही यासाठी अर्ज केला असेल लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आलंय का हे पाहण्यासाठी pmkisan.gov.in वर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

असं तपासा तुमचं नाव

कोणती माहिती चुकीची तर नाही हे आधी तपासून पाहा. फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा. यानंतर तिथे आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल. इथे तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे का ? हे तपासता येईल. जर तुमचा अर्ज जर आधार, मोबाईल नंबर किंवा बॅंक खाते या कारणामुळे राहीला असेल तर ते डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करु शकता.

अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जर तुम्ही अर्ज केला असाल तर लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव तपासून पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!