मेधा कुलकर्णींचं ट्विट “आज फिर दिल को हमने समझाया”

पुणे/प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारल्याने पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातून ऐनवेळी त्यांचं तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषेदसाठी उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन दिलं असल्याचा उल्लेख मेधा कुलकर्णी यांनी केला होता. पण पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यादी जाहीर होताच मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरला एका पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत “आज फिर दिल ने एक तमन्ना की….आज फिर दिल को हमने समझाया” हे गाण्याचे शब्द लिहिलेले आहेत. मेधा कुलकर्णी यांनी भाजपाचा उल्लेख केला नसला तरी उमेदवारी न दिल्याने आपणच आपली समजूत घातली असल्याचं मेधा कुलकर्णी यांच्या ट्विटमधून स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!