पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

औरंगाबाद/प्रतिनिधी

येत्या दोन दिवसात निम्म्या मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा शिडकावा होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नऊ आणि दहा मे रोजी पावसाचा अंदाज नसला तरी त्या पुढील ११ ते १३ मे रोजी जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा होईल, असा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी (नऊ मे) नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल. रविवारी (दहा मे) जालना वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.अवकाळी पावसाने खरिपाची धुळधाण केली, पुन्हा अवकाळीमुळे रब्बी पिकांना तसेच फळपिकांना फटका बसला. मार्च महिन्यातही अवकाळी पावसाने मराठवाड्यातील अनेक गावांना झोडपले होते. या वेळी रब्बी पिकांना तसेच फळपिकांचे नुकसान केले. सततच्या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!