बीड जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू:एक कोरोना तर दुसरा संशयित होता
बीड जिल्ह्यात कोरोना ग्रस्त असलेल्या व उपचार घेत असलेल्या रुग्णाचा तर स्वॅ ब तपासणीसाठी घेतल्यावर संशयित रुग्णाचा मृत्यूच्या घटना घडू लागल्या आहेत आज बीड येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या एका वृद्धाचा तर
केजच्या रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित ३२ वर्षीय तरूणाचा मंगळवारी पहाटे अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात मृत्यू झाला.
केज तालुक्यातील नांदूरघाट येथील तरूणाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे केजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने सोमवारी दुपारी त्याचा स्वॅब घेण्यात आला. रात्री उशीरा तो अत्यावस्थ झाल्याने त्याला १२.३० वाजता अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात हलविण्यात आले. तिथे अवघ्या तासाभरात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरूणाच्या स्वॅबचा रिपोर्ट मंगळवारी येण्याची शक्यता आहे.तर बीड येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोना ग्रस्त वृद्धाचा आज पहाटेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले बीड जिल्ह्यात ही 12 वी घटना आहे