बीड जिल्ह्यात कोरोना 600 च्या जवळ:आज 32 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यातून बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब तपासणीला पाठवल्यानंतर आज 32 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

आज 27/05/2020

गेल्या 24 तासात आढळून आलेले रुग्ण

बीड – 27
परळी – 21
गेवराई – 10
अंबाजोगाई – 05
माजलगाव – 02
शिरूर – 01

एकूण – 66

बीड जिल्ह्यात बघता बघता कोरोनाचा आकडा 600 च्या घरात आहे आज 567 संख्या आहे, कालच्या अहवालामध्ये 34 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक बाधित रुग्णांची संख्या बीड आणि परळी मध्ये अधिक आहे जे नागरिक चार महिन्यापासून घरात बसून आहे अशा नागरिकांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत,कुणाच्याही संपर्कात नसताना आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेकजण भयभीत होऊ लागले आहेत,एकीकडे ही परिस्थिती असताना काही ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून व्हिडीओ करून आपण अत्यंत मजेत आणि सुरक्षित आहोत कोरोना वगैरे काही नाही असे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरू लागले आहेत त्यामुळे नागरिकांची द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यात रुग्ण वाढ असली तरी बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे अनेक रुग्णांना कोरोना बरोबर इतर देखील आजार असतात, असे रुग्ण उपचारासाठी इतर गावी जात आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!