बीडमध्ये पुन्हा लॉक डाऊन ही अफवाच


बीड
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली त्यामुळे बीडमध्ये पुन्हा लॉक डाऊन होणार अशी चर्चा आणि सोशल मीडियावर मॅसेज फिरू लागल्याने अनेक नागरीकामध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे मात्र ही अफवा असून यावर कुणीही विस्वास ठेऊ नये असे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे

बीडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा दि 15 जुलै पासून लॉक डाऊन होणार असे मॅसेज व चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे याबाबत प्रशासनाने अद्याप कुठलाही निर्णय किंवा आदेश काढलेला नाही किंवा तसा विचारही झालेला नाही असे सांगण्यात आले आहे सध्या अफवांचे पेव मोठ्या प्रमाणात पसरवले जात आहे बीड बंद होणार का ?याबाबत अनेकांनी फोन करून विचारणा करण्यास सुरुवात केली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना करण्यात येत आहे व सूचनांचे पालन करावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे यास नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!