मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करून शंकर देशमुख यांनी केला वाढदिवस साजरा

आष्टी। प्रतिनिधी
आष्टी तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस शंकर देशमुख यांनी वाढदिवसाच्या बडेजावला फाटा देत परंपराही टाळून सामाजिक बांधिलकी जपत पती – पत्नी दोघांनी मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे
सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपा सरचिटणीस शंकर देशमुख यांचा पंन्नासावा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा केला आयुष्यभर समाजसेवा सामाजिक बांधिलकी माणुन काम करणारे देशमुख यांनी मरणोत्तर अवयव पत्नी सौ.गिरिजा देशमुख यांचेसह दानाचा संकल्प आष्टी येथील ग्रामिण रुग्णालयात केला त्या आशयाचे पत्र व सर्व फार्म त्यांनी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बालाजी गुट्टे यांच्याकडे सादर केले.
सध्या नागरिकांमध्ये वाढदिवस वाजतगाजत साजरा करण्याचे मोठ्या प्रमाणावर रुजले आहे. तरुणाईमध्ये तर याची विशेष आवड लागलेली आहे सद्यस्थिती कोरोना या विषाणुमुळे सर्वत्र भीतिचे वातावरण आहे वाढदिवसाला होणारा खर्च टाळत आणि विनाकारण होणारा खर्च याला आष्टी तालुका भाजपा सरचिटणीस शंकर देशमुख यांनी मात्र याला छेद देत आपण समाजाचे देणेकरी आहोत, अशी समर्पणाची भावना ठेऊन मरणोत्तर देहाचे अवयव काढून त्या अवयवाच,जिवंतपणे पिडीत आणि रोगग्रस्त गरजु लोकांच्या देहात रोपन करता येते विषेशकरुन नेत्रदान करुन एखाद्याला दृष्टी देण्याचे काम मरणोत्तर करता येऊ शकते देशमुख पती – पत्नी यांनी अवयव दानाचा संकल्प करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.सामाजिक भान आणि जाण असल्याने त्यांनी मरणोत्तर अवयव दान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे या आदर्शवत संकल्पाचे तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.कोरोना लाॅकडाऊन काळात कडा आणि परिसरात तीस दिवस अखंड गोरगरिबांना घरपोच खिचडीचे जेवणाचे पॅकेट वाटत केले होते खा.प्रीतमताई मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरून शंकर देशमुख व पत्नीचे अवयव दानाच्या संकल्पा बाबत अभिनंदन व कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!