बीड शहरात कडकडीत लॉकडाउन आठ दिवस बंद राहणार बीड शहर


बीड
बीड शहरात आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज आढळून आलेल्या एका बाधित रुग्णाच्या संपर्कात अनेक लोक आले असल्याची माहिती येत असून संपूर्ण बीड शहर लॉक डाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी घेतला आहे शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत

जिल्ह्यात कोरोना बाधित संख्या वाढत असून बाधित असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात अनेक जण आले आहेत आज आढळून आलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात बीड शहरातील अनेक लोक संपर्कात आले असावेत अशी माहिती येत असून उद्या पासून आठ दिवसासाठी संपूर्ण शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे अत्यावश्यक सेवा वगळता बीड शहरातील कुठलेही व्यवहार चालू राहणार नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!