आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीचे नियम


बीड
कारेगाव तालुका पाटोदा येथील एक आढळून आल्यामुळे कारेगाव सह परिसरातील तीन किलोमीटर अंतरावर असणार्या गावांमध्ये पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्याचबरोबर सदरील रुग्ण हा बीड शहरातील अनेकांच्या संपर्कात आलेला आहे त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण बीड शहरात व बीड तालुक्यातील खंडाळा चराटा पालवण पाटोदा तालुक्यातील वैजाळा डोंगरकिनी वडवणी तालुक्यातील देवडी गेवराई तालुक्यातील खांडवी मादळमोही व धारवंटा तसेच केज तालुक्यातील खरमटा धारुर तालुक्यातील पारगाव या गावांमध्ये आठ दिवसासाठी दिनांक 4 जून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत

संचार बंदीच्या काळात कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात येत असून वैद्यकीय सेवा ,वर्तमानपत्रे व माध्यम विषयक सेवा 24 तास चालू राहतील ,बीड शहरात व वरील गावांमध्ये विशेष परवानगीशिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेर जाता येणार नाही अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालय वगळता( महसूल ग्रामविकास व आरोग्य) बीड शहरातील सर्व स्थापना शासकीय खाजगी व बँका बंद राहतील परंतु बीड शहरातील शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख व बँक यांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्याशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालये उघडण्याची व अतिशय मर्यादा ठेवून कर्मचाऱ्यांना बोलण्याची परवानगी घ्यावी बीड शहरातील व गावातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही परंतु मेडिकल इमर्जन्सी मधील पास साठी बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करून पाच प्राप्त करून घ्यावा बीड शहरातील व गावांमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून वापरावे कोरोना विषाणूचे अनुषंगाने ताप सर्दी खोकला डोकेदुखी व स्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळून आल्यास सदरील ॲपच्या माध्यमातून तात्काळ माहिती भरावी बीड शहर व वरील गावे वगळता जिल्ह्यातील इतर सर्व भागांमध्ये याआधी दिलेले आदेश कायम राहतील असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!