उस्मानाबाद जिल्हात आणखी 3 पॉजिटीव्ह

उस्मानाबाद जिल्हातील कोरोना बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले

उस्मानाबाद -प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हात आणखीन तीन जणांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे त्यात उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर मधील एक, कळब तालुक्यातील शिराढोण येथील एक आणि उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील एक जण आहे. उस्मानाबाद येथील रुग्ण मुंबई रिटर्न, तेर मधील पुणे रिटर्न तर शिराढोण येथील रुग्ण कोरोना बाधित कुटुंबातील आहे, उस्मानाबाद जिल्हातील कोरोना बाधितांची संख्या 38 वर झाली आहे.
जिल्हा रुग्णालय मार्फत 25 मे 2020 रोजी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या अहवालामधील प्रलंबित असलेल्या 5 अहवालांमधून 3 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल अनिर्णित आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!