आजचा अहवाल दिलासादायक;50 निगेटिव्ह 7 प्रलंबित
जिल्हाभरातून पाठवण्यात आलेल्या 57 स्वॅब पैकी 50 अहवाल निगेटिव्ह आले असून सात जणांचे अहवाल प्रलंबित आहेत बीड जिल्ह्यातून कोरोना बाधित संख्या वाढत असतानाच आजच्या आलेल्या अहवालामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे या अहवालाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते
आज सोमवारी 57 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 57 पैकी 50 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 7 रिपोर्ट प्रलंबित आले आहेत. दरम्यान क्वारंटाईन असतांना मयत झालेल्या त्या व्यक्तीचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
बीड जिल्ह्यासाठी आज मोठा दिलासा मिळाला आहे.