बीड जिल्ह्यात नियम व अटींवर दारू विक्री साठी परवानगी-जिल्हाधिकारी


बीड
बीड जिल्ह्यात सर्व कंटेनमेंट व बफर झोन वगळून इतर क्षेत्रातील किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती बिअर शॉपी वाईन शॉप देशी दारू किरकोळ विक्री दुकानात सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मद्य अनुज्ञप्ती मधून ग्राहकांना सील बंद बाटलीतून मद्यविक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे

जिल्ह्यातील “सर्व कंटेनमेंट झोन व बफर झोन वगळून ” इतर क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या अटीवर सीलबंद बाटलीत मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश राहूल रेखावार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी दिले आहेत.

शासनाचे आदेशान्वये बीड जिल्हा “नॉन
रेड झोन म्हणून घोषित केला आहे.ज्यास अनुसरुन आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनीे विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या अटींवर घाऊक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांना मद्याची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे

प्रत्येक मद्य विक्री दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात सहजरित्या दिसेल असा फलकावर पुढील तपशील लावणे गरजेचे
(अ) दुकानांच्या कामकाजाच्या सुधारित वेळा
(ब) एका वेळी दुकानासमोर ५ पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत.
(क) Social Distancing व Mask वापर अनिवार्य आहे.
(ड) सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल या ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तीने दुकानात प्रवेश करू नये.
(इ) दुकानात मद्यप्राशन करता येणार नाही.
(ग) दुकानाकडून / ग्राहकाकडून नियमभंग झाल्यास त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई केली जाईल.

राज्यातील नमुना एफएल-II अनुज्ञप्ती
प्रकारात स्पिरीट्स, सौम्य मद्य, बीअर व वाईन आणि नमुना एफएल , बीआर-|| प्रकारात बीअर व वाईन सीलबंद घरपोच परवानाधारकास विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच
नमुना एफएल-३ अनुज्ञप्ती शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत अथवा लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांना सीलबंद विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील “सर्व कंटेनमेंट झोन व बफर झोन वगळून इतर क्षेत्रातील किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या एफएल-२ / सीएलएफलटीओडी-३ अनुज्ञप्ती (वाईन शॉप), एफएलबीआर-२ (बीअर शॉपी), व सीएल-३ अनुज्ञप्त्या (देशी दारु किरकोळ विक्री दुकाने) चे अनुज्ञप्तीधारकांना सकाळी ०९.०० वाजेपासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
त्यांच्या मद्य विक्री अनुज्ञप्तीमधून ग्राहकांना सीलबंद बाटलीतून मद्य विक्री करता येईल.

मद्य विक्रीची परवानगी देण्यात आलेल्या अनुज्ञप्त्यांपैकी फक्त नमुना एफएल-II अनुज्ञप्त्यांना विदेशी मद्य, सौम्य मद्य, बीअर व वाईन तर नमुना एफएल/बीआर-II अनुज्ञप्त्यांना बीअर व वाईनची ग्राहकांना सीलबंद बाटलीत घरपोच मद्यसेवा सकाळी ०९.०० वाजेपासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पुरविण्याकरीता पुढीलप्रमाणे विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.

घरपोच मद्य सेवा ही किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती प्रकार म्हणजेच एफएल-II, एफएल/बीआर-II व
एफएल/डब्ल्यु -|| मधून विक्रीसाठी असलेल्या उक्त नमूद मद्य प्रकारासाठीच राहील. तथापि देशी मद्याची घरपोच मद्य सेवा देता येणार नाही.

घरपोच मद्य विक्री सेवा ही केवळ अधिकृत वैध नमुना एफएल-एक्स-सी परवानाधारकास करण्यात येईल. ग्राहकाकडे परवाना नसल्यास त्यास नमुना एफएल-एफ परवाना अनुज्ञप्तीधारक देतील. सदरचा परवाना पुढील संकेतस्थळावर https://stateexcise.maharashtra.gov.in किंवा
https://exciseservices.mahaonline.gov.in वर तात्काळ उपलब्ध आहे.

मद्याची मागणी नोंदविण्यासाठी मद्य सेवन परवानाधारक ग्राहक व्हाट्सअप / लघुसंदेश / भ्रमणध्वनी / दूरध्वनीचा वापर करु शकेल. किरकोळ मद्य विक्री करणारा अनुज्ञप्तीधारक असा क्रमांक ठळकपणे त्यांच्या दुकानाबाहेर प्रदर्शित करतील. तसेच अनुज्ञप्तीधारक पर्याप्त उपलब्ध माध्यमांचा वापर करुन घरपोच सुविधा देण्याची कार्यवाही करतील. मागणीप्रमाणे घरपोच सेवा देण्यासाठी अनुज्ञप्तीधारकास त्यांचे स्वतःची वितरण व्यवस्था करावी लागेल.

शासन आदेशाप्रमाणे विहित कालावधीसाठी मर्यादित सेवा असल्याने वितरण व्यवस्था करणा-या इसमांसाठी मद्याची ने-आण करतांना वाहतूक परवान्याऐवजी सामान्यत: निरिक्षक किंवा दुय्यम निरिक्षक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-याने मंजूर केलेले ओळखपत्र देण्यात येईल. अनुज्ञप्तीधारकाने वितरण व्यवस्थेसाठी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ ठेवावे. तथापि, त्याची संख्या १० पेक्षा अधिक नसावी.

ओळखपत्र असलेल्या व्यक्ती एका वेळी ग्राहक / ग्राहकांच्या मागणीपेक्षा अधिक मद्य
वाहतूक करणार नाहीत. तथापि अशा व्यक्ती – डिलीव्हरी बॉय कोणत्याही परिस्थितीत २४ युनिटपेक्षा जास्त मद्याची वाहतूक करणार नाहीत.
लॉकडाऊन कालावधीत जिल्हाधिकारी यांनी दुकाने उघडी ठेवण्यासाठी जो कालावधी निर्धारित केला असेल त्याच कालावधीत दुकानातून मद्य वितरित करणे अपरिहार्य राहील.

अनुज्ञप्तीधारक घरपोच मद्य सेवा किंवा त्यांची वितरण व्यवस्था चोख करण्यास जबाबदार असेल. मद्य घरपोच पुरविल्यानंतर अनुज्ञप्तीधारक परवानाधारकास मद्य पोच झाल्याचा पुरावा प्राप्त करतील. परवानाधारकाकडून मद्याची किंमत ही रोख स्वरुपात अथवा क्रेडिट / डेबिट कार्ड स्वाईप मशिनच्या माध्यमातून डिलीव्हरी बॉयने स्विकारावी.

अनुज्ञप्तीधारकास मद्याची घरपोच सेवा देतांना मद्य छापील किरकोळ विक्री किंमतीने (MRP) विक्री करणे बंधनकारक आहे. घरपोच मद्य सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा सेवा शुल्क आकारण्यात येऊ नये.

वितरण व्यवस्थेत वापरण्यात येणा-या व्यक्ती व डिलीव्हरी बॉय यांच्या बाबतीत पुढील बाबी पाळणे बंधनकारक राहील-
त्याची नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी (RMP) यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करावी व वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असावा व तसे प्रमाणपत्र प्राप्त करुन त्यांनी सदर प्रमाणपत्र सोबत बाळगावे.
अशा प्रमाणपत्रधारकासच ओळखपत्र देण्यात येईल.
iii. सदर व्यक्तिस मास्क, हेड कॅप व हैंड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तीने निर्जतुकीकरणासाठी हँड सॅनिटायझरचा वापर वेळोवेळी करणे बंधनकारक राहील.
अनुज्ञप्तीधारकास सदर कामगाराचे वेळोवेळी थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक राहील. जर कामगाराचे शारीरिक तापमान विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले तर त्याचे ओळखपत्र तात्काळ काढून घ्यावे व त्याची वैद्यकीय तपासणी करुन आवश्यक वैद्यकीय सुविधा देण्यास मदत करावी.
vi. जे डिलीव्हरी बॉय नोकरी सोडून जातील अथवा ज्यांना कामावरुन कोणत्याही कारणास्तव कमी करण्यात येईल, त्यांचे ओळखपत्र न चुकता संबंधित कार्यक्षेत्राच्या राज्य उत्पादन शुल्क अधिका-याकडे जमा करण्याची जबाबदारी अनुज्ञप्तीधारकाची राहील.

J. केंद्रशासन व राज्य शासनाच्या लॉकडाऊन संदर्भाच्या मार्गदर्शक तत्वानुसार घरपोच मद्य वितरण सेवेमध्ये कार्यरत व्यक्तींना आपत्ती निवारण, चोख स्वच्छता राखणे व कोव्हीड संदर्भात इतर बाबतीत उदा. आरोग्य
सेतु अॅपचा वापर याबाबत सखोल प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अनुज्ञप्तीधारकाची राहील.
k. घरपोच मद्य सेवा देणे हा एक अलिखित करार असून सदरचा करार अनुज्ञप्तीधारक, वाहतूक करणारा व परवानाधारक-ग्राहक यांच्यातील असून यातील कोणत्याही बाबीच्या वादासंबंधामध्ये शासन अथवा राज्य उत्पादन शुल्क विभाग जवाबदार राहणार नाही.
I. संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी नमुना एफएलआर -३ व नमुना एफएलआर -३ ए नोंदवह्यांमध्ये घरपोच सेवेंतर्गत विक्री होत असलेल्या मद्याच्या विशेष नोंदी करावयाच्या आहेत. त्याशिवाय घरपोच मद्यविक्री केलेल्या परिमाणाची एक अतिरिक्त स्वतंत्र नोंदवही ठेवावी.
m. प्रचलित नियमान्वये असलेल्या मद्य बाळगणे, वाहतूक करणे इ. मद्यसेवन परवान्यातील तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची संबंधित अनुज्ञप्तीधारकाने दक्षता घ्यावयाची आहे.
N.सदर सुविधेचा अवलंब करीत असतांना मद्यविक्रीच्या दुकानाच्या ठिकाणी येणा-या ग्राहकांना दुकानातून थेट मद्यविक्री करण्यास बाधा येणार नाही. दुकानात मद्य खरेदी करण्यासाठी येणा-या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतराचे (social distancing ) पालन होणे बंधनकारक राहील.

याचबरोबर जिल्ह्यातील सर्व कंटेनमेंट झोन व बफर झोन वगळून इत्तर क्षेत्रातील सर्व घाऊक नमुना एफएल -१ व सीएल -२ अनुज्ञप्त्या सकाळी ०९.०० वाजेपासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
४) बीड जिल्ह्यातील “सर्व कंटेनमेंट झोन व बफर झोन वगळून ” इतर क्षेत्रातील एफएल -३ परवानाकक्ष अनुज्ञप्तीधारकांना सकाळी ० ९ .०० वाजेपासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत त्यांच्या मद्य विक्री अनुज्ञप्तीमधून खालील मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या अटीवर ग्राहकांना सीलबंद बाटलीतून मद्य विक्री करण्याची परवानगी
देण्यात येत आहे.
a. सदरची सवलत एफएल -३ अनुज्ञप्तीधारकास त्यांच्याकडील दि. २४ मार्च २०२० अखेरीस असलेला मद्यसाठा संपेपर्यंत किंवा लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत यापैकी जे आधी होईल, तोपर्यंत लागू राहतील.
b. एफएल -३ अनुज्ञप्तीधारकास त्यांच्या अनुज्ञप्तीतील शिल्लक मद्यसाठा सीलबंद बाटलीतून फक्त” Off Consumption ” साठी मद्यसेवन परवानाधारकानांच विक्री करता येईल.
c. मद्यसाठा एमआरपी दराने विक्री करणे क्रमप्राप्त राहील व त्यावरील विक्रीकर (Composition Tax) रितसर भरणे बंधनकारक राहील.
d. एफएल -३ अनुज्ञप्तीधारकांनी मद्यसेवन परवानाधारकास अनुज्ञप्तीच्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास देऊ नये. अन्यथा आदेशाचा भंग मानला जाईल.
e. संबंधित एफएल -३ अनुज्ञप्तीधारक विशेष पासान्वये बिअरचा साठा एफएल/ बीआर -२ अनुज्ञप्तीधारकास एक वेळ विक्री करु शकेल. परंतु त्याकरीता एफएल/ बीआर -२ अनुज्ञप्तीधारकाची मंजूरी असणे आवश्यक राहील.
f. एफएल -३ अनुज्ञप्तीधारकास त्याच्या अनुज्ञप्तीमधून शिल्लक मद्यसाठा सीलबंद विक्रीसाठी सदर परवानगी दिलेली असून त्यांना नव्याने मद्यसाठा, हे आदेश लागू असेपर्यंत. खरेदी करता येणार नाही.
g. एफएल -३ अनुज्ञप्तीधारकांनी मद्य विक्रीस सुरुवात करण्यापूर्वी त्यांचे अनुज्ञप्तीमधील नमुना एफएलआर -३ व एफएलआर -३ ए नोंदवह्यांतील दि. २४.०३.२०२० रोजीच्या शिल्लक मद्याची माहिती संबंधित कार्यकारी दुय्यम निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना कळविणे बंधनकारक आहे. त्यांना तेवढ्याच मद्यसाठ्याची विक्री करता येईल. मद्यसाठा विक्री होऊन संपल्यानंतर संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिका-यास याबाबत माहिती देणे आवश्यक राहील.
h. बिअरचासाठा मुदतबाह्य झाला असल्यास अथवा त्याची प्रत खराब झाली असल्यास त्याची विक्री अनुज्ञप्तीधारकांनी करु नये.
i. एफएल -३ अनुज्ञप्तीधारकांना नमुना एफएल -१ व एफएल/ डब्ल्यु -१ अनुज्ञप्तीकडून, हे आदेश लागू असेपर्यंत,नव्याने मद्य खरेदी करता येणार नाही.
j. संबंधित एफएल -३ अनुज्ञप्तीधारकाकडे शिल्लक असलेल्या मद्यसाठ्याचीच विक्री करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत एफएल -३ अनुज्ञप्तीधारकास घाऊक मद्य विक्रेत्याकडून अथवा एफएल -२ अनुज्ञप्तीधारकाकडून विना परवाना मद्यसाठा आणता येणार नाही. एफएल -२ अनुज्ञप्तीमधून मद्यसाठा आणल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित एफएल -३/ एफएल -२ अनुज्ञप्तीविरुद्ध कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

सोबत जिल्हाधिकारी यांचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!