कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या भाजप नेत्याला पुन्हा कोरोनाची लागण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लस पुढच्या काही दिवसात उपलब्ध होईल अशी घोषणा केलेली असतानाच आता एक धक्कादायक बातमी आलेली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला डोस घेतलेले हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झालेली आहे. याचाच अर्थ कोरोनाची लस घेतल्यानंतरदेखील त्यांना लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.


अनिल विज यांना 20 नोव्हेंबर रोजी व्यक्तींच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला डोस देण्यात आला होता. अनिल विज यांनी शनिवारी एक ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितले आहेत. तसेच संपर्कात आलेल्या सगळ्यांनी खबरदारी घ्यावी आणि आपल्या टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहनदेखील त्यांनी केलेले आहे.


error: Content is protected !!