बीड

बीड जिल्ह्यात संचारबंदी नियमात बदल सकाळी 7.30 ते सांयकाळी 6.30 पर्यंत दुकाना चालू -जिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यात सम विषम तारखेच्या निर्णयात बदल अटी शर्थी नुसार जिल्ह्यातील काही दुकाने सकाळी 7,30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत उदया पासून दररोज सुरू राहणार असून सर्व हॉटेल,ढाबे, खानावळी यांना घरपोच सेवा देण्यास व ब्युटीपार्लर, सलून दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे तर दारू दुकानासाठी देण्यात येणारी परवानगी स्वतंत्र आदेश देऊन देण्यात येणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहेत

संचारबंदीत मोठी सवलत; दररोज चालू ठेवता येणार दुकाने!

‌▪‌ केशकर्तनालये, ब्युटी पार्लर, ऑटोरिक्षांनाही मिळाली परवानगी

बीड : बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज (दि. २५ मे) रोजी दिलेल्या आदेशानुसार संचारबंदीत मोठी सवलत दिल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांना आता दुकाने दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत चालू ठेवता येणार आहे. त्यासोबतच केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर चालू ठेवण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे.

आजच्या आदेशानुसार काय चालू काय बंद? जाणून घ्या.. :

‌•‌ सर्व स्थानिक व आंतराष्ट्रीय विमान प्रवास सेवा (स्थानिक वैद्यकीय सेवा ,विमान रुग्णवाहिका आणि सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्रालय यांनी परवानगी दिलेले विमान प्रवास व्यतिरिक्त सर्व सेवा) बंद राहतील.

‌•‌ शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, शिकवणी केंद्रे इ. बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण/ दुरस्थ शिक्षण चालू राहील आणि त्यास प्रोत्साहन देण्यात येईल.

‌•‌ सरकारी कर्मचारी/ पोलीस/ आरोग्य कर्मचारी/ अडकलेल्या व्यक्ती/प्रवासी/अलगीकरण कक्ष/ विलगीकरण कक्ष/ बस्थानक व रेल्वे स्थानक यांचेसाठी असलेली हॉटेल / उपहार गृहे वगळता सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर सेवा देणारे आस्थापना बंद राहतील. रेस्टॉरंटला पार्सल सेवा देण्यासाठी सुट देण्यात येत आहे. सर्व हॉटेल, ढाबे, चाट सेंटर्स, खानावळी इ.ना केवळ घरपोच सेवेसाठी/ पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात येत आहे.

‌•‌ सर्व सिनेमा गृहे, मॉल, व्यायाम शाळा, जलतरणिका,मनोरंजन उद्याने, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील.

‌•‌ सर्व सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्य व इतर संमेलने व जमावास बंदी राहील.

‌•‌ सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. धार्मिक परिषद/संमेलने /जमाव यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

‌•‌ क्रिडासंकुले, क्रिडांगणे व इतर सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तीक व्यायामासाठी खुल्या राहतील, परंतू प्रेक्षक व सामुहिक क्रिडा/व्यायाम कृतींना परवानगी राहणार नाही. सर्व शारिरिक कसरती, व्यायाम व तत्सम कृतींना कोव्हीड १९ विषयक सर्व नियमावली आणि सामाजिक अंतराविषयक नियमांचे पालन करण्याचे अटीवर परवानगी देण्यात येत आहे.

‌•‌ सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करणारे व्यक्तींना प्रवासी वाहतूकीचे नियम पाळून वाहने वापरता येतील. दुचाकीवर फक्त चालकाला परवानगी असेल. तीन चाकीमध्ये चालक अधिक दोन प्रवासी आणि चारचाकीमध्ये चालक आणि दोन प्रवाश्यांना परवानगी देण्यात आली आहे.

‌•‌ जिल्हयांतर्गत बस सेवेला केवळ ५० टक्के प्रवासी क्षमतेसहच परवानगी देण्यात येत आहे. सदरील बसमध्ये सामाजिक अंतर आणि कोव्हीड-१९ विषयक स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहतील.जिल्हा बाहेरील बस सेवे संदर्भात शासनाचे आदेश आल्यावर वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.

‌•‌ बार व दारु दुकानांना परवानगी देण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

‌•‌ पानटपरी, तंबाखू.गुटखा,पानमसाला, खर्रा व तत्सम सर्व बाबींच्या विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी सेवनास बंदी कायम राहील.

‌•‌ सर्व केशकर्तनालये, ब्यूटी पार्लर व तत्सम दुकानांना सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असून सर्व ठिकाणी सामाजिक अंतर कोव्हीड-१९ विषयक स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहतील.

M) कंटेनमेंट झोन व बफर झोन मध्ये कार्यालयाच्या आदेशाप्रमाणेच व्यवसायांना परवानगी असेल.

‌•‌ संध्याकाळी ०७.०० वा. ते सकाळी ०७.०० वा. काळामध्ये जीवनावश्यक सेवांशी संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती पास असूनही घराबाहेर राहू शकणार नाही.

‌•‌ ६५ वर्षपिक्षा जास्त वयांच्या व्यक्ती ज्यांना जूने आजार आहेत. रक्तदाब, मधुमेह, इतर तत्सम व गंभीर विकार, मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती इ. गर्भवती महिला, १० वर्षाखालील बयांची मुले व मुली यांना जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर कधीही पडता येणार नाही.

‌•‌ कोणत्याही दुकानामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती असू नये आणि त्या प्रत्येक व्यक्ती मध्ये किमान ६ फुट अंतर असावे. ही दुकानदारांची वैयक्तिक जबाबदारी असेल.

‌•‌ सर्व आस्थापना/दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वा. पर्यंतच्या कालावधीत दररोज चालू राहतील. बँकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळे प्रमाणे काम करावे. सदरील ठिकाणी गर्दी झाल्यास अथवा सामाजीक अंतर राखले न गेल्यास सक्षम प्राधिकारी त्वरीत असे दुकाने/ मार्केट पुढील आदेशा पर्यंत बंद करतील आणि उपस्थित नागरिक व दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. सबब याविषयी सर्व दुकानदार द नागरिकांनी काळजी घेणे बंधनकारक आहे. सर्वच नागरिकांनी आता अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *