औरंगाबादमध्ये पाच जणांचा मृत्यू कोरोना बळीची संख्या 55

औरंगाबाद/ प्रतिनिधी

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 11 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोनामु क्त होऊन घरी परतले आहेत. तर औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.
कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.30 वाजता झाला आहे.या महिलेला 23 तारखेला घाटीत भरती करण्यात आले होते.त्याना हायपरटेन्शनचा त्रास होता.तर गारखेडा येथील 48 वर्षीय पुरूष रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.35 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 22 तारखेला भरती करण्यात आले होते. त्यांना मधूमेह त्रास होता.तर आज 25 मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांना 18 तारखेला भरती करण्यात आले होते.तर कैलास नगरातील 75 वर्षीय महिलेचा पहाटे 3.15वाजता मृत्यू झाला आहे.त्यांना 19 तारखेला भरती करणयात आले होते. तर सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यांना 20 तारखेला भरती करण्यात आले होते.त्यांना हायपरटेन्शन थायराईडचा त्रास होत.या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे.एकूण 55 पैकी घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!