उस्मानाबाद जिल्ह्यात धोका वाढला; गुरुवारी कोरोनाचे 8 नवे रुग्ण
उस्मानाबाद प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी गुरुवारचा दिवस घातक ठरला असून एकूण कोरोना चे 8 रुग्ण सापडले आहेत उमरगा शहरातील एक महिला आणि शिराढोण येथील एक महिला कोरोना बाधित सापडल्यानंतर रात्री उशिरा 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, यामध्ये वाशी 1, परंडा 1, लोहारा तालुक्यातील जेवळी येथील 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 72 जणांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत . त्यामध्ये वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील सहा वर्षाची मुलगी, लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्णाच्या संपर्कातील 4 जण पॉझिटिव्ह आले असून परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीतील रुग्णाच्या संपर्कातील 27 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आला आहे. शिराढोण येथील महिलेचे स्वब लातूर घेण्यात आल्याने तांत्रिकदृष्ट्या याची मोजणी लातूर जिल्हातील आकडेवारीत करण्यात आली आहे..
उस्मानाबाद जिल्हात रुग्ण संख्या 23 झाली असून 4 जण बरे झाले आहेत आणि 19 जणांवर रुग्णालयात सुरु आहेत ..