धक्कादायक! बीडमध्ये कोरोनासाठी स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा आयसोलेशन वार्डमध्ये मृत्यू

बीड / प्रतिनिधी
कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णलयात आणून आयसोलेशन वार्ड मध्ये दाखल केले. रात्री 9 वाजता त्याचा स्वब घेतला. त्यानंतर अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता अहवालाची प्रतीक्षा आहे.
आष्टी तालुक्यातील एक रुग्ण मागील चार दिवसांपासून आजारी होता. सुरुवातीला तो जामखेड येथे उपचारासाठी गेला. नंतर आष्टीला गेला. नंतर श्वास घ्यायला त्रास होत असल्याने, दम भरत असल्याने त्याला बीडला हलवले. त्याला अगोदरच भरपूर आजार होते. बीडला येण्यापूर्वीच त्याची प्रकृती चिंताजनक होती. रात्री 9 वाजता आल्यावर त्याचा स्वॅब घेतला. त्यांनतर अवघ्या काही तासात त्याचा मृत्यू झाला. आता त्याचा अहवाल काय येतो याकडे लक्ष लागले आहे. 
दरम्यान, जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या37 झाली आहे. सध्या 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1 मयत तर 1 कोरोनामुक्त झालेला आहे. 6 रुग्ण पुण्याला गेलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!